आधी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी माफी मागावी-ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे


स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने विडंबनात्मक काव्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता. त्यावरुन संतापलेल्या शिवसैनिकांनी थेट हॅबिटॅट स्टुडिओ फोडला.राज्यात अनेक वर्षांनंतर झालेल्या तोडफोडीमुळे पुन्हा एकदा दशकभरापूर्वी शिवसैनिकांनी पत्रकारांवर झालेले हल्ले, माध्यमांच्या कार्यालयांवर झालेले हल्ला याची चर्चा होतेय. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होते ती, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यांची. याच निमित्ताने निखिल वागळे हे मुंबई तक चावडीवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांसोबतच उद्धव ठाकरे, संजय राऊतांवरही निशाणा साधलामहाराष्ट्राचं आजचं चित्र अत्यंत वाईट आहे, भयंकर आहे. सगळीकडे गुंडगिरी आणि धर्मांधता याचं थैमान सुरूय “असं ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे म्हणाले. उपमुख्यमंत्र्‍यांची माणसं जाऊन स्टुडिओ तोडत आहेत. हे बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे. मी याचा कायम निषेध करत आलो. याला जबाबदार काँग्रेस आहे. कारण, पहिला हल्ला झाला, त्याच वेळी प्रत्यक्षात चौकशी झाली नाही असं निखिल वागळे म्हणाले. तसंच यावेळी निखिल वागळे यांनी संजय राऊत उद्धव ठाकरेवंरही निशाणा झाला.जे संजय राऊत आता बाता मारतायत, त्यांनाही चार गोष्टी सांगतो” असं म्हणत निखिल वागळेंनी एक किस्सा सांगितलं. एका वृत्त वाहिनीमध्ये असताना शिवसैनिकांनी हल्ला केला, थेट माझ्यावर हल्ला झाला. पण आमच्या स्टाफने शिवसैनिकांना रोखलं. शेवटी परिस्थिती अशी आली की, शेवटी शिवसैनिकांनाच माझ्या पाया पडावं लागलं. कारण आमचा स्टाफ खूप चिडलेला होता. मात्र, बाहेर यांनी उलट आमच्यावर अटेम्पट टू मर्डरचा गुन्हा दाखल केला. विचारा संजय राऊतला हे केलं की नाही? शिवसेनेनं आम्हाला हा त्रास दिलेला आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी हा त्रास दिलेला आहे असं वागळे म्हणालेत.कोणत्याही पक्षाला लेखन स्वातंत्र्य, कलावंतांचं स्वातंत्र्य, कवींच्या स्वातंत्र्यावर प्रेम नाही. आपल्या बाजूचा आहे की नाही एवढाच त्यांचा प्रश्न. आज उद्धव ठाकरे कुणाल कामराची बाजू घेतात तेव्हा मला काही महत्व वाटत नाही. महानगरवरच्या हल्ल्याबद्दल माफी मागा…संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी महानगर आणि आयबीएनवर केलेल्या हल्ल्याबद्दल माफी मागावी, तरंच त्यांना नैतिकता मिळेल असं” निखिल वागळे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button