
कासव विणीचा हंगाम लांबल्याने यंदा वेळास कासव महोत्सवाचे भवितव्य अंधारात
कासव विणीचा हंगाम लांबल्याने तसेच वनविभाग व स्थानिकांनी या संदर्भात कमालीची गुप्तता पाळल्याने यावर्षीच्या वेळास येथील कासव महोत्सवाचे भवितव्य अंधारात आहे. महोत्सवाबाबत जनजागृती अथवा प्रसिद्धी वनविभाग अथवा स्थानिकांकडून केली जात नसल्यामुळे कासवांच्या पिल्लांच्या जन्मोत्सव सोहळ्यापासून पर्यटक, निसर्गप्रेमी वंचित रहात आहे. वनविभागाची कार्यपद्धती यास जबाबदार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
ऑलीव्ह रिडले समुद्री कासवांच्या संरक्षण मोहिमेमुळे वेळास गाव गेल्या सोळा वर्षापासून जगाच्या नकाशावर आले. यामुळे गावात पर्यटन उद्योग विकसित झाला. जन्मसोहळा पाहण्यासाठी राज्यासह देशातील पर्यटक व अभ्यासक या गावास भेट देतात. यासाठी विणींच्या हंगामात कासव महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. www.konkantoday.com




