
समोर कोणीही असला तरीही आपल्याला विजयाची खात्री- निरंजन डावखरे
कोकणामध्ये महायुतीचे वर्चस्व आहे. तर मागील बारा वर्षात आपण अनेक कामे कोकण पदवीधर मतदार संघात केलेली आहेत. त्यामुळे समोर कोणीही असला तरीही आपल्याला विजयाची खात्री असल्याचे प्रतिपादन भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी रत्नागिरीत केले.महायुतीच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी भाजपाच्या वरिष्ठांनी पुन्हा संधी दिल्याबद्दल सर्वच पदाधिकार्यांचे आभार मानले. महायुतीच्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क या मतदार संघात आहे. पाच जिल्ह्यांचा हा मतदार संघ आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर व ठाणे या जिल्ह्यांचा आहे. सर्वच जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे जाळे असल्याने, याठिकाणी आपल्याला निश्चित त्याचा फायदा होणार आहे.मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार आपण मानले आहेतwww.konkanyoday.vom