लांजा भूमी अभिलेख कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग, लांजा शहर समन्वय समितीने घेतली तहसीलदारांची भेट.

लांजा भूमी अभिलेख कार्यालयामध्ये अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे तालुक्यातील जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या बाबत संबंधित कार्यालयाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने लांजा शहर समन्वय समितीने तहसीलदार प्रियांका ढोले यांना निवेदन दिले आहे.शहर समन्वय समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भूमी अभिलेख कार्यालयात पुरेसे कर्मचारी नसल्याने जनतेची कामे वेळेवर होत नाहीत.

अनेक कामे कार्यालयात पडून आहेत. तसेच कार्यालयातील अनेक महत्त्वाची मूळ कागदपत्रे, नकाशेही गहाळ झाली आहेत. तर काही कागदपत्रे अतिशय जीर्ण झाली आहेत. जमीन मोजणीच्या अनेक कामांना अजूनही तारखा दिलेल्या नाहीत.कोमासाठी आलेल्या लोकांना योग्य उत्तरे दिली जात नाहीत. कागदपत्रांमध्ये काही परस्पर फेरफार केल्याच्या तक्रारी आहेत. वारंवार तक्रार करूनही कार्यालयाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button