
राष्ट्रीय गो कार्ट डिझाईन स्पर्धेत आंबव कॉलेजचे यश.
आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीम फुल थ्रोटलने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्पर्धा गाजवली. कोईम्बतूर (तामिळनाडू) येथे पार पडलेल्या गो कार्ट डिझाईन चॅलेंज स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी केली.इसनी मोटारस्पोर्ट फॉर्म्युला गो कार्ट डिझाईन चॅलेंज सिझन बारमध्ये निवड झालेल्या महाविद्यालयाच्या विविध शाखेतील २८ सदस्यीय टीमने विविध किताब पटकावून पुन्हा एकदा महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.www.konkantoday.com