
राज्यावर संकट! हवामान विभागाने वर्तवला सतर्कतेचा इशारा!
: देशात एकीकडे उष्णतेची लाट, तर दुसरीकडे बर्फाचं वादळ. अशा टोकाच्या हवामान बदलांनी नागरिकांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता पुन्हा एकदा वाढू लागली असताना, उत्तर भारतातील पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी आणि पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस हे हवामानाचे टोकाचे प्रकार कायम राहण्याची शक्यता आहे.*महाराष्ट्रात मागील काही दिवस पावसाच्या ढगांनी वातावरण गार झाले होते. मात्र हे ढग आता मागे हटू लागले आहेत आणि उष्णतेचा दाह पुन्हा वाढतोय. विशेषतः विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. काही ठिकाणी पारा 37 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.*
इराणमार्गे सरकत असलेला नवा पश्चिमी झंझावात सध्या हिमालयाच्या दिशेने सरकतो आहे. याचा थेट परिणाम जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जाणवतो आहे. या भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्येही पावसाची हजेरी लागणार असल्याने, थंडी पुन्हा जाणवू शकते.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत विदर्भात उष्णतेचा जोर वाढणार आहे. दरम्यान, कोल्हापूर, पुणे, जळगाव, सातारा, नाशिक, रत्नागिरी आणि मुंबई या शहरांमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवलं जात आहे. यामुळे नागरिकांना दुपारी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
तापमानाची नोंद (अंश सेल्सिअस)
पुणे – 36.6 / 17.2जळगाव – 37.7 / 17.0
कोल्हापूर – 37.1 / 21.0
निफाड – 35.7 / 12.0
सातारा – 36.7 / 18.4
रत्नागिरी – 33.0 / 21.6
मुंबई – 34.6 / 26.0
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर उत्तर भारतात पश्चिमी झंझावातामुळे पाऊस, बर्फवृष्टी आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. नागरिकांनी अधिकृत हवामान अद्ययावत माहितीकडे लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला दिला जात आहे.