
कल्पना पकये यांना आदर्श सरपंच पुरस्कार.
रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील सरपंच कल्पना पकये यांना पुण्यातील नालंदा ऑर्गनायझेशनतर्फे देण्यात येणारा आदर्श सरपंच पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.पकये यांनी कोविड काळात गावात सॅनिटायझिंग केले. यासह कोविड लसीकरणावेळी विशेष ग्रामकृतीदल स्थापन केले. तसेच त्यांनी गावात महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, महिलांसाठी आरोग्य शिबिर यासह विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना नालंदा ऑर्गनायझेशनतर्फे हा पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला. यावेळी निवृत्त कृषी सहसंचालक श्रीपाद खळीकर, अभिनेते विनोद वणवे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.फोटो मजकूर..गणपतीपुळे सरपंच कल्पना पकये यांना आदर्श सरपंच पुरस्कार नुकताच पुणे येथे प्रदान करण्यात आला. यावेळी श्रीपाद खळीकर, विनोद वणवे यांच्यासह अन्य मान्यवर..




