
रत्नागिरीत मालमत्ता, पाणी कर थकबाकीदार कारवाईच्या फेर्यात, १४ कोटी रुपयांच्या वसुलीसाठीचे आव्हान
रत्नागिरी नगर परिषदेची मालमत्ता कर थकवणार्यांविरोधातील मोहीम अधिक गतीमान करण्यात आली आहे. पाणी आणि मालमत्ता कर थकबाकी असलेल्या १४ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी आतापर्यंत ६४ मालमत्ता सील तर ४७ नळपाणी कनेक्शन तोडण्याची कारवाई केल्यामुळे थकबाकीदार हडबडले आहेत. रत्नागिरी नगर परिषदेने मालमत्ता कर थकवणार्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे.www.konkantoday.com