
मुंबई- गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात विचित्र अपघात सिमेंटच्या बकलर टॅंकरने कारला धडक देत उभ्या ट्रकला धडक, २०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक.
मुंबई- गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सिमेंटच्या बकलर टॅंकरने कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर बकलर याच ठिकाणी नादुरुस्त असलेल्या ट्रकवर आदळला आणि ट्रक जवळपास २०० फुट खाली खोल दरीत कोसळलाया अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून पाचजण जखमी झाले आहेत.मुंबई- गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात हा विचित्र अपघात झाला आहे. घाट रस्ता असल्याने याठिकाणी अवजड वाहने धीम्या गतीने जात असतात.
अशातच हा अपघात घडला आहे. गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सिमेंटच्या बकलर टँकरने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकला. यामुळे ट्रक थेट दरीत जाऊन कोसळला.सिमेंट बकलर देखील खोल दरीत कोसळला. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत. तर बकलरमधील चालकासह क्लीनर देखील जखमी झाला आहे. असे एकूण सातजण जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकरणी जीवितहानी झाली नाही. तर दोन्ही ट्रक दरीत कोसळल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कारचे देखील यात नुकसान झाले आहे.