
विमानतळाच्या रन-वेची वायुसेनेने केली चाचणी
चिपी विमानतळावर काल (दि.१६) सकाळी ११ वाजता एक विमान लॅन्डिंग झाले, त्या विमानाने सायंकाळी पाचच्या सुमारास चिपी विमानतळाच्या धावपट्टीवरून टेकऑफ घेत विमानतळावर एक घिरटी घातली.त्यानंतर ते विमान खोल समुद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले. काही वेळातच परत ते विमान माघारी येत विमानतळाच्या धावपट्टीवर काही वेळ स्थिरावत गोव्याच्या दिशेने रवाना झाले. हे विमान वायुसेनेचे असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, दि. ४ डिसेंबररोजी मालवण येथील किल्ल्यावर नौसेना दिन साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चिपी विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी तसेच नाईट लॅन्डिंग यंत्रणेची टेस्टींग घेण्यासाठी ते विमान आले असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्म, पंतप्रधान नरेंद्र मोदी, या प्रमुख व्यक्तींसह अनेक मान्यवर मंडळी सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्याची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. चिपी विमानतळावरील यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नाईट लॅन्डिंग सुविधाही बसविण्यात आली आहे. परिणामी रात्रीची विमाने लँन्डिंग होणे व टेकऑफ घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
www.konkantoday.com