
मटका, जुगाराची माहिती द्या अन ५ हजाराचे बक्षीस मिळवा, कॉंग्रेस कॉंग्रेस युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांचे अनोखे आवाहन.
चिपळूण शहरात राजरोसपणे चालणारा मटका जुगार बंद होण्याच्या दृष्टीने कॉंग्रेस युवक जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी अनोखे अभियान सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर मटका-जुगार अड्ड्याची माहिती द्या आणि ५ हजार रोख बक्षीस मिळवा, अशा स्वरूपातील बॅनर त्यांनी शहरातील बाजारपूल येथे उभारले आहे. यामुळे राजरोसपणे मटका-जुगार चालवणार्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.शहरातील गोवळकोट रोडसह इतरत्र चालणार्या मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करावी, यासाठी सरगुरोह यांनी निवेदन दिले होते. त्यात २० ते २५ वयोगटातील तरूण पिढी वळली असल्याचे नमूद केले आहे.
असे असताना मटका-जुगार यामुळे कुटुंबे उध्वस्त होवू नयेत, शहरात राजरोसपणे चालणारा मटका-जुगार पूर्णतः बंद व्हावा यासाठी त्यांनी मटका-जुगार मुक्त अभियान सुरू केले आहे. त्यांचे पाच हजार बक्षिसांचे बॅनर झळकताच राजरोसपणे मटका चालवणार्यांचे धाबे दणाणले आहेत. अनेकांनी या अभियानाचे स्वागत केले आहे.www.konkantoday.com