
भिंगळोलीत फ्लॅटमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात यश
मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील भारती अपार्टमेंटमधील फ्लॅट क्र.३ मध्ये गुरुवारी आढळून आलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यात मंडणगड पोलिसांना यश आले आहे. या मृत व्यक्तीचे नाव अभिजित भाऊ कदम (४०, रा. दुधेरें, ता. मंडणगड) असे आहे. मृताच्या खिशात असलेल्या कागदांमधील दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधला असताना नातेवाईकांशी बोलणे झाल्याने या मृतदेहाची ओळख पटून आली. मृताच्या आईने मृतदेहाची ओळख पटवून देत मंडणगड पोलीस ठाणेत या बाबत खबर दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित यास दारुचे व्यसन होते. १५ मार्च रोजी रात्री १० च्या सुमारास अभिजित हा आईला मी ठाणे येथे कामासाठी जात आहे, असे सांगून दुधेरेतील घरातून निघून गेला. तो परत आला नाही. त्यानंतर तो २० मार्च रोजी भारती अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. या बाबत मंणगड पोलीस ठाणेत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.www.konkantoday.com