
दापोली तालुक्यातील करंजाळी येथे घरफोडीत ५१ हजाराचा ऐवज लंपास.
दापोली तालुक्यातील करंजाळी येथून घरातील कपाट ङ्गउघडून सुमारे ५१,५०० रुपयांचा ऐवज अज्ञाताने लांबवला. ही घटना १४ मार्च रोजी सायं. ६ ते १८ मार्च रोजी सायं. ६ च्या सुमारास घडली. चोरीस गेलेल्या ऐवजात दागिन्यांसह रोख रक्कमेचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्याने निवेदिता सुधाकर चव्हाण (करंजाळी) यांच्या घराच्या किचन खोलीच्या भिंतीवरुन बेडरुममध्ये प्रवेश करुन बेडरूममधील पत्र्याच्या लोखंडी गोदरेजच्या कपाटाच्या लॉकरमधील १७,००० रु. किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, ८,५०० रु.ची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ८,५०० रु.ची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १३,६०० रु.चे ८ ग्रॅम वजनाच्या कानट्ट्या, १,७०० रु.ची १ ग्रॅम वजनाची मोत्याची नथ, २०० रु. किंमतीची चमकी, २ हजार रू. रोख रक्कम असा ५१ हजार ५०० रु.चा ऐवज लंपास केला. या चोरीमागे माहितगार व्यक्ती असल्याचा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाणेत गुन्हा दाखल झाला आहे.www.konkantoday.com