
तरूणी चक्कर येऊन तलावात पडली; जीवाची पर्वा न करता दोघा तरुणानी तिला वाचवले.
सावंतवाडीतील मोती तलावाकाठी गप्पा मारत असलेल्या एका महाविद्यालयीन युवतीला अचानक चक्कर आल्याने ती चक्क तलावात कोसळली पण हा प्रसंग ज्यांनी बघितला त्यांनी लागलीच धावाधाव केल्याने ती महाविद्यालयीन युवती बुडता बुडता थोडक्यात वाचली त्या मुलीचे नशीब बलवत्तर म्हणूनच त्या दोघा तरूणानी जीवाची पूर्वा न करता त्या युवती ला सहीसलामत बाहेर काढले.
ही घटना शनिवारी सायंकाळी राजवाड्यासमोर घडली. घटनेनंतर पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवला असून आपणास चक्कर आल्यानेच तोल जाऊन तलावात पडल्याचे त्या युवतीने म्हटले आहे. या युवतीला वाचवणाऱ्या सावंतवाडीतील दिपेश शिंदे व एकनाथ गावडे या दोघा तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.