
ढोल ताश्यांचा गजर तसेच फुलांची उधळण करीत ग्रेट इंडियन कोस्टल सायक्लोथॉन 2025 चे रत्नागिरीत उत्साहात स्वागत
ढोल-ताश्यांचा गजर सोबत फुलांची उधळण करत ‘सुरक्षित तट, समृद्ध भारत’ या थीम अंतर्गत देशातील पहिल्या ‘ग्रेट इंडियन कोस्टल सायक्लोथॉन’ चे रत्नागिरीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यातआले.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) कडून 7 मार्च रोजी लखपत (गुजरात) ते कन्याकुमारी येथे सुरू झालेला देशातील पहिला ‘ग्रेट इंडियन कोस्टल सायक्लोथॉन’ शनिवारी रत्नागिरी येथे आगमन झाले. ‘सुरक्षित तट, समृद्ध भारत’ या थीम अंतर्गत, या रॅलीचे उद्दिष्ट किनारी भागात राष्ट्रीय सुरक्षेबद्दल जागरुकता निर्माण करणे, ड्रग्ज, शस्त्रे आणि स्फोटकांसह तस्करीमुळे निर्माण होणार्या धोक्यांवर प्रकाश टाकणे हा आहे. ही मोहीम 7 मार्च रोजी पूर्व किनार्यावरील पश्चिम बंगालमधील बक्खली येथून सुरू झाली आहे.
पश्चिम मार्ग 3,775 किलोमिटर तर पूर्व मार्ग 2,778 किलोमिटरचाआहे.या रॅलीचे शहरांनजीक असलेल्या सर्वंकष विद्यामंदीर मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल ताश्यांचा गजर तसेच फुलांची उधळण करण्यात आली. या कार्यक्रमाला कमांडंट राहुलकुमार, सर्वंकषच्या प्रीन्सीपल मोनिका जयस्वाल, शहर पोलीस निरीक्षक शिवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी देशभक्ती गीत सादर करण्यात आले तसेच ड्रग्ज, दारु, सिगरेट यावर छोटीशी नाटीका सादर करण्यात आली. त्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. यानंतर देशासाठी लढताना मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबाचा यावेळी गौरव करण्यात आला. रत्नागिरीतली 5 सैनिकांच्या कुटुंबांचा यामध्ये समावेश होता.