डॉ. सौरभ लिमये यांना डीएम कार्डिओलॉजी परीक्षेत सुवर्णपदक, रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव

लांजा, 22 मार्च : लांजा तालुक्याचे सुपूत्र डॉ. सौरभ लिमये यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयुएचएस) च्या डीएम कार्डिओलॉजी या अंतिम परीक्षेत राज्यात प्रथम येत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या वैद्यकीय शैक्षणिक परंपरेत आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.डीएम कार्डिओलॉजी ही वैद्यकीय क्षेत्रातील एक उच्चतम वैद्यकीय पदवी मानली जाते. या क्षेत्रातील परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक मिळविणे ही एक अत्यंत प्रतिष्ठेची बाब मानली जाते. प्रचंड मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याच्या जोरावर डॉ. सौरभ लिमये यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांचे हे यश लांजा तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.

दरम्यान, डॉ. सौरभ लिमये यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.डॉ सौरभ हा लांजा येथील जुन्या काळातील सुप्रसिद्ध डॉक्टर कै. य. दा. लिमये यांचा नातू आहे तसेच रत्नागिरी शहरातील त्या काळातील सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर कै. मोहनराव दिवेकर यांचाही नातू आहे. डॉ सौरभ ह्याने त्याची डीएम कार्डिओलॉजी रेसिडेन्सी लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज,सायन मुंबई येथून पूर्ण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button