
गणपतीपुळे अल्ट्राच्या माध्यमातून कोकणात अल्ट्रा मॅरेथॉनची मुहूर्तमेढ.
सुवर्णसूर्य फाउंडेशन; ५६ किमी- कृष्णात सोनमले, निलिमा भडगावकर, रजनी सिंग, अमोल यादव प्रथम३५ किमी- प्रतिभा सिंग, जॉर्ज थॉमस, माणिक वाघ, आणि अकुलती निलेकर अव्वल.
रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाऊंडेशन आयोजित कोकणातील पहिल्या गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ५६ किमीच्या मॅरेथॉनमध्ये कृष्णात सोनमले, निलिमा भडगावकर, रजनी सिंग, अमोल यादव यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. तर ३५ किमीच्या मॅरेथॉनमध्ये प्रतिभा सिंग, जॉर्ज थॉमस, माणिक वाघ, आणि अकुलती निलेकर यांनी आपल्या गटात अव्वल स्थान पटकावून स्पर्धा गाजवली.

थंडी, गार वारा आणि चढ-उतारामध्ये चांगलाच कस लागल्याची प्रतिक्रिया स्पर्धकांनी व्यक्त केली. तसेच या मॅरेथॉनने कोकणात नवीन अध्याय सुरू झाल्याची भावना व्यक्त केली.गणपतीपुळे ते बसणी या मार्गावर रात्री १२ ते सकाळी ८ या वेळेत झालेल्या हा स्पर्धेचा थरार रंगला. गणपतीपुळे येथे श्रींच्या मंदिराच्या प्रांगणात झेंडा दाखवत राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. ३५ किमी आणि ५६ किमीच्या या दोन स्पर्धांमध्ये २५० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली.
गणपतीपुळे ते बसणी व परत या मार्गावर या स्पर्धेला सर्व ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला.मॅरेथॉनसाठी गणपतीपुळे, मालगुंड, भंडारपुळे, नेवरे, आरे- वारे, बसणी येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले. उद्घाटनासाठी संस्थान श्री देव गणपतीपुळेचे पंच निलेश कोल्हटकर, मुख्य पुजारी प्रभाकर घनवटकर, श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाबाराम माने, एमटीडीसीचे व्यवस्थापक वैभव पाटील, अॅथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे, हॉटेल असोसिएशनचे अप्पा लोध, सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रांताधिकारी जीवन देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, बाबू म्हाप, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी, सूर्यकांत देवस्थळी, सौ. सुवर्णा देवस्थळी, सौ. तेजा देवस्थळी यांच्यासमवेत अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, अशा स्पर्धांमुळे केवळ आरोग्याचा संदेशच नव्हे तर समाजात एकजुटीचा आदर्शही निर्माण होतो.
शारीरिक व्यायामाचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांनी सर्व धावपटूंना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा झाली. स्पर्धेवेळी हायड्रेशन पॉईंटवर पाणी, कलिंगड, केळी, संत्री, खजूर, मीठ, कोकम सरबत यासह पाण्याचा फवारा, बर्फाचे पॅकेट्स यासह अनेक प्रकारच्या सुविधा स्पर्धकांना देण्यात आल्या. डिलाईट इंडस्ट्रीने मार्गावर प्रकाशयोजनेची व्यवस्था केली. तसेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सदस्यांनी मार्गावर व्यवस्थापन केले. निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी आणि असीमित (पुणे) यांनी हायड्रेशनसाठी मदत केली. फिनोलेक्स इंडस्ट्री, प्राचीन कोकण- एक अनोखे म्युझियम, फास्ट अँड अप, सॉर्जेन यांचे स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य मिळाले.
आरोही फिजिओ थेरपी आणि एस. एम. जोशी कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे धावपटुंच्या फिजिओथेरपीची व्यवस्था केली.चौकट स्पर्धेचा गटनिहाय निकाल असा५६ किमी- ४१ वर्षांवरील पुरुष- कृष्णात सोनमले, सिद्धेश भिडे, अजित गोडभारले, पांडुरंग बोडके, विश्वनाथ क्षिरसागर. ४१ वर्षांवरील महिला- निलिमा भडगावकर, वरुणा राव, चैताली लांबट. ४० वर्षांपर्यंत महिला- रजनी सिंग, अनुभा अगरवाल, गीता परब. ४० वर्षांपर्यंत पुरुष- अमोल यादव, अमित बाठे, मनिष यादव.३५ किमी- ४१ वर्षावरील महिला- प्रतिभा सिंग, नेहा सिंग, अमृता सिंग. ४१ वर्षांवरील पुरुष- जॉर्ज थॉमस, सूर्यकांत पारधी, स्वप्नील माने. ४० वर्षांपर्यंत पुरुष- माणिक वाघ, आश्वनी पांडे, रवि पुरोहित. ४० वर्षांपर्यंत महिला- अकुलती निलेकर, तनुश्री मालविय, जिगिप्सा गमित.”मी आतापर्यंत खूप मॅरेथॉन आणि अल्ट्रा मॅरेथॉन धावलो आहे.
पण गणपतीपुळे येथे जो जिव्हाळा आणि आपुलकी मिळाली ती कुठेच नाही. या जगन्नाथाच्या रथास अनेकांचा हातभार लागला असेल, त्या सर्वांचे आभार. नोंदणी, सहभागी होणाऱ्या सर्वांचे लहान लहान प्रश्न सोडवणे, मोदक आणि कोकम सरबताने सरबराई हे सर्व अप्रतिम. पहिलीच अल्ट्रा असूनही श्रींच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या मेहनतीने पार पडली.”-डॉ. अमित सामंत (बालरोगतज्ज्ञ, विरार)