
खेड तालुक्यातील खोपी गावातील (जाभेलवाडी) डोंगराच्या पायथ्याशी वसलेली धनगर समाज बांधवांची चार घरे शनिवारी वणव्यात जळून खाक.
खेड तालुक्यातील खोपी गावातील (जाभेलवाडी) डोंगराच्या पायथ्याशी वसलेली धनगर समाज बांधवांची चार घरे शनिवारी (दि.२२) वणव्यात जळून खाक झाली. वाडीत पाणी व रस्ता नसल्याने काही कुटूंबे उन्हाळ्यात पाण्याच्या जवळ स्थलांतरित झाली आहेत.त्यामुळे आग लागली तेव्हा घरांमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.वणव्याने लागलेल्या आगीत पार्वती बबन ढेबे, रंजना लक्ष्मण ढेबे, लक्ष्मी जानू ढेबे, मोहन जानू ढेबे यांची घरे जळून खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. घरातील धान्य, भांडी व कपडे जळून खाक झाल्याने चार कुटुंबे बेघर झाली आहेत.