खास होळीसाठी सुरू करण्यात आलेल्या कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांचा प्रवास थांबला.

कोकण मार्गावर शिमगोत्सवासाठी चालवण्यात आलेल्या मडगाव-पनवेल होळी स्पेशलच्या धावलेल्या चारही फेऱ्यांना चाकरमान्यांना प्रतिसाद लाभला. स्पेशलची अखेरची फेरी २२ मार्च रोजी धावणार आहे. मडगाव-एलटीटी होळी स्पेशलही २३ मार्च रोजी यार्डात विसावणार आहे०११०२/०११०१ क्र.ची मडगाव-पनवेल साप्ताहिक स्पेशल २२ रोजी मडगाव येथून सकाळी ८ वाजता सुटून सायंकाळी ५.३० वा. पनवेल येथे पोहचेल. परतीला पनवेल येथून सायंकाळी ६.२० वा. सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ६.४५ वा. मडगाव येथे पोहचेल. २० एलएचबी डब्यांच्या स्पेशललला करमाळी, थिविम, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण स्थानकात थांबे आहेत.

या पाठोपाठ ०११०४/०११०३ क्र.च्या मडगाव-एलटीटी साप्ताहिक स्पेशलचीही २३ मार्च रोजी अखेरची फेरी आहे.मडगाव येथून सायंकाळी ४.३० वा. सुटून पहाटे ६.२५ वा. एलटीटीला पोहचेल. परतीच्या प्रवासात २४ रोजी स्पेशल एलटीटीहून सकाळी ८.२० वा. सुटून रात्री ९.४० वा. मडगाव येथे पोहचेल. २० एलएचबी डब्यांची स्पेशल करमाळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आरवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवले, ठाणे स्थानकात थांबेल.शिमगोत्सवासाठी १३ मार्चपासून कोकण मार्गावर चालवण्यात आलेल्या चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमू स्पेशलच्या फेऱ्यांनाही चाकरमान्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. मेमूच्या ८ फेऱ्या चालवण्यात आल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button