
किराणा मालाच्या दुकानात आलेल्या चिमूरडीवर 80 वर्षाच्या वृद्धाचा अत्याचार.
रायगडमधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. एका 80 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्य हद्दीत ही घटना घडली आहे.आरोपी हमजा यासीन दाभीळकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या मनात लज्जास्पद भावना निर्माण होईल, अस कृत्य करणाऱ्या एका 80 वर्षीय व्यक्तीला रायगडच्या माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. म्हसळा तालुक्यातील संदेरी गावात राहणारा हमजा यासीन दाभीळकर याचे किराणा मालाचे दुकान आहे.
या दुकानात गेलेल्या एका तीन वर्षीय मुलीसोबत आरोपीने गैरवर्तन केले तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्यावरून तिच्यासोबत 80 वर्षीय व्यक्तीने गैरवर्तन केले. यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार मुलीने आपल्या वडिलांना सांगितला. चिमुकलीने आपबिती सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या वडिलांनी गोरेगाव पोलिसांनी ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी केलेल्या मेडिकल रिपोर्टनुसार संबंधित मुलीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. यानंतर आरोपीवर बाल लैंगिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे