
जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली.
जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. ३० जूनपर्यंत ही मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार वाहनधारकांनी मुदतीपूर्वी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवून घ्यावी, असे आवाहन केले आहे.शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) ३१ मार्च २०२५ पर्यंत बसवण्याचे आदेश देण्यात आले होते. आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याचे काम फारच कमी झाले आहे. ज्या एजन्सी नेमल्या आहेत त्या कमी असल्याने ते काम संथगतीने सुरू आहे.
जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे. ३० जूनपर्यंत ही मुदतवाढ दिली आहे.सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी/उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कार्यक्षेत्रात याबाबत जनजागृती करावी तसेच स्थानिक वाहनवितरक, ऑटोरिक्षा/टॅक्सी/बस/ट्रक संघटनांची बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करावे, असे आवाहन परिवहन कार्यालयाने केले आहे.जिल्ह्यात सुमारे अडीच लाखाच्यावर वाहनांना अजून हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसवणे बाकी आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकच एजन्सी नेमली आहे. त्यांच्याकडेही कमी मनुष्यबळ असल्याने तेवढ्या वेगाने हे काम होताना दिसत नाही. ही नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनांची संख्या मोठी आहे.