
कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी जागतिक दर्जाच्या विकासाचे नियोज
आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी कसबा संगमेश्वर येथे आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा गौरव जपत, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी सरदेसाई वाड्याच्या सभोवतालच्या ५ एकर जागेत भव्य आणि जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे.

हे स्मारक महाराजांच्या शौर्यगाथेचे प्रतीक ठरणार असून त्यांच्या महान कार्याची आठवण प्रत्येक पिढीला करून देईल, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.


छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची महती जगभर पोहोचविण्यासाठी हे स्मारक एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. या स्मारकाच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी ग्वाही यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दिली.
