अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाचे रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना वाहतूकदारांच्या समस्येबाबत निवेदन

अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाच्यावतीने वाहतूक महासंघाच्या समस्येबाबत रत्नागिरीचे उपविभागीय प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारीनंतर स्कूल बस व्यावसायिक संकटाचा सामना घेवून उभारी घेत आहोत. मात्र लॉकडाऊन काळात सरकारने शाळेच्या मालकीच्या व खाजगी मालकीच्या सर्व स्कूल बसचा दोन वर्ष कालावधीचा टॅक्स माफ केला परंतु १/३ या दराने असलेल्या करारातील गाड्यांचा टॅक्स माफ झाला नाही. उलटपक्षी ऑनलाईन संगणक प्रणालीमध्ये तोच टॅक्स १/३ ऐवजी २/३ या दराने येत आहे. २/३ ही प्रणाली शालेय वाहतुकीबरोबरच इतर संस्था किंवा कंपनीशी करार असणार्‍या वाहनांसाठी आहे.
आम्ही फक्त शालेय वाहतूक करतो. तरी शाळा व्यवस्थापन करार करण्यास तयार होत नसल्याने पालकांच्या सोबतच्या करारान्वये सदर वाहने शालेय बस म्हणून नोंदणी कराव्यात. तसेच सद्यस्थितीत १/३ दराने वाहनांचा आपल्याकडे कार्यालयात थेट कर भरून समायोजित करावा. ज्यायोगे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करणे शक्य होईल. तसेच ज्या वाहनांचा टॅक्स भरला आहे तो पुढील कालावधीसाठी समायोजित करावा. सदरच्या कालावधीत व्यवसाय बंद असल्याने व्यवसाय कर माफ करावा. व्यवसाय कराशिवाय आवश्यक असलेली सर्व कार्यालयीन कामे मार्गी लावावीत. तसेच व्यवसाय कर भरलेली सर्व वाहनांचा व्यवसाय कर पुढील कालावधीसाठी समायोजित करावा.
मॅक्सी कॅब वर्गातील वाहने गेली चार वर्षे नोंदणी बंद आहे. त्यासाठी करू नयेत असा कोणताही न्यायालयाचा आदेश नसताना सदर नोंदणी बंद आहे तरी ही नोंदणी सुरू करावी व काही वाहनांचा आरएमए नंबर घेवून परवाना प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच सुट्टीच्या कालावधीत स्पेशल परवान्यासंदर्भात परिवहन आयुक्तांकडून स्पेशल परमीट देण्याचे स्पष्ट आदेश असल्याने सदर परवाना सर्व स्कूलबस वर्गातील वाहनांना ऑनलाईन मिळावा अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी वाहतूक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button