
विकास शेटे यांचा सोवेली पंचक्रोशी सहकारी औद्योगिक वसाहतीत मिनरल वॉटरप्रकल्प.
मंडणगड सोवेली पंचक्रोशी सहकारी औद्योगिक वसाहतीच्या औद्योगिक क्षेत्र शिरगाव येथे विकास एंटरप्रायझेस यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कोकण ऑक्सि या मिनरल वॉटर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील पहिला मिनरल वॉटर प्रकल्प सुरू झाल्याने येथील नागरिकांना तालुक्यातच तयार झालेले मिनरल वॉटर उपलब्ध होणार आहे.
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष व कोकण ऑक्सि प्रकल्पाचे मालक विकास शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विश्वदास लोखंडे, अॅड. राकेश साळुंखे आदी उपस्थित होते.