
रत्नागिरी शहरातील निवखोल परिसरात एकाला मारहाण.
रत्नागिरी शहरातील निवखोल परिसरात मध्यरात्री एका इंटेरियर डिझायनरवर कोयत्याने हल्ला करून मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २० मार्च २०२५ रोजी पहाटे १२:१५ वाजता घडली असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी मुस्तकिम मुबीन सोलकर (वय ३०, व्यवसाय-इंटेरियर डिझायनर, रा. घर नं. २२९ ब, सोमेश्वर मुस्लीम मोहल्ला, ता.जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या आत्येबहिणीला डबा देऊन घरी परतत असताना निवखोल येथे हा हल्ला झाला.
रात्री १२:१५ वाजण्याच्या सुमारास आरोपी जैद दाऊत (रा. राजिवडा-निवखोल, ता.जि. रत्नागिरी) याने कोणतेही ठोस कारण नसताना फिर्यादी यांना शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्याने कोयत्याने मुस्तकिम यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ वार केला. याचवेळी जैदच्या सोबत असलेल्या इतर तीन अज्ञात व्यक्तींनी फिर्यादी यांना रस्त्यावर खाली पाडून हाताच्या ठोशांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.