आम्हाला मान्यता देवून मशनरी पुरविल्यास पडवे कॉलेजमध्ये २० दिवसात लॅब सुरु करू- आमदार नितेश राणे

आमच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजला कोरोना लॅब उभी करायची नसल्यास शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या कॉलेजमध्ये ती उभी करा; परंतु लॅब लवकर सुरू करा. कारण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अहवाल प्रलंबित आहेत. अनेक दिवस क्वारंटाईन व्यक्तींना आपण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहोत, हे समजत नाही.
लॅब न झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांचा मृत्यू झाल्यास प्रशासनाविरोधात तक्रार दाखल करणार. जिल्ह्याच्या हितासाठी आम्ही उद्रेकाच्या उंबरठ्यावर आहोत, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला. यावेळी त्यांनी आम्हाला मान्यता देवून मशनरी पुरविल्यास पडवे कॉलेजमध्ये २० दिवसात लॅब सुरु करू शकतो, असे आश्‍वासन दिले.भाजपच्या शिष्टमंडळाने काल जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button