रत्नागिरी आणि चिपळूण पालिकेला अत्याधुनिक फायर अॅण्ड रेस्क्यू व्हॅन.

आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून रत्नागिरी आणि चिपळूण पालिकेला अत्याधुनिक वाहने मिळाली आहेत. डोंगराळ भाग, खडकाळ आणि अरूंद मार्गावरील आगीवर नियंत्रण मिळवणे यामुळे सोपे होणार आहे. वेगळा गिअर, कटर, फोम, लाईट आणि पाण्याची व्यवस्था असणारी ही फायर अॅण्ड रेस्क्यू व्हॅन आहे.रत्नागिरी जिल्हा हा दऱ्याखोऱ्यातील डोंगराळ आणि खडकाळ आहे.

उन्हाळ्यात गवताला आणि फळबागांना आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये शॉर्टसर्किटचेही प्रमाण अधिक आहे. अशा डोंगराळ भागात आग लागल्यानंतर अग्रिशमन वाहन त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. अशावेळी रत्नागिरी आणि चिपळूण पालिकेला मिळालेली नवीन गाडी उपयोगी पडणार आहे. डोंगरातून जाणाऱ्या खडकाळ वाटेवरूनही जाऊ शकतील, अशी त्या वाहनांच्या चाकांची रचना आहे आणि स्पेशल गिअर आहे. त्यामुळे आता आणखी एका नवीन फायर अँड रेस्क्यू अग्निशमनची भर पडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button