
बाथरूम ला जाण्यासाठी दुचाकी द्या लगेच येतो असे सांगून विश्वासघात करून दुचाकी चोरून आरोपी फरारी.
रत्नागिरी तालुक्यातील निवळीफाटा येथे फुलांच्या व फळ दुकानदार मालकाने पेट्रोल पंपात बाथरुमला जाण्यासाठी दुचाकी दिली. दुचाकी घेऊन पलायन करणाऱ्या संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर गोटुराम जाधव (रा. जळगाव, पुर्ण पत्ता माहित नाही) असा संशयित आहे. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास निवळी फाटा येथील श्री स्वामी समर्थ फुलांचे व फळांच्या दुकानात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नितेश वामन सावंत (वय २७, रा. निवळी, रत्नागिरी) यांनी संशयित ज्ञानेश्वर यास बाथरुमला जाण्यासाठी स्वतःची दुचाकी (क्र. एमएच-०८ एव्ही ४६३७) ही दिली. ती दुचाकी घेऊन संशयिताने पलायन केले. या प्रकरणी नितेश सावंत यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.