दिव्यांग मंगेशला मिळाली यांत्रिक व्हीलचेअर आर एच पी फाऊंडेशनचा पुढाकार : काजू युनिटमध्ये काम.

रत्नागिरी : दिव्यांग कु.मंगेश दत्ताराम शिवगण.वय ३२ वर्ष. शिक्षण १२ वी. मु.पो.कोंडीये ता.राजापुर जि.रत्नागीरी.वडील श्री.दत्ताराम सोनु शिवगण शेती करायचे सध्या घरीच असतात.आई सौ.सुलोचना दत्ताराम शिवगण गृहीणी आहेत.मंगेशला दोन बहीणी व एक भाउ सगळे विवाहीत आहेत.मंगेश जन्मत:च अस्थीव्यंगाने अपंग आहे.

मंगेशचे ४ थी पर्यतचे शिक्षण गावीच झाले.गावी त्याची आई भाउ त्याला उचलुन शाळेत घेवुन जात परत आणत.2005 साली ५वी मधे कोल्हापुरच्या हेल्पर्स अॉफ दि हॅण्डीकॅप संस्थेत प्रवेश घेतला.संस्थेत आल्यावर तिथे त्याला व्हीलचेअर मिळाली.होस्टेलमधे राहुन १२ वी पर्यतचे शिक्षण पुर्ण केले.अपंगत्वामुळे शाळेत खुप उशीरा घातले होते.वय जास्त असल्यामुळे अर्थिक पुर्नवसनाच्यादृष्टीने 2017 साली संस्थेच्या स्वप्ननगरी या सिंधुदुर्गमधे असलेल्या काजुप्रकल्पामधे कामासाठी गेला.तिथेही होस्टेलमधे राहुन व्हीलचेअरवरुन काजुयुनिटमधे ग्रेडींग विभागात काम करुन स्वत:च्या पायावर उभा आहे.स्वावलंबी आयुष्य जगत आहे.व्हीलचेअरवरुन फार लांब जावुन कामं करता येत नाहीत.व्हीलचेअर ढकलण्यासाठी दुसर्‍यांवर अवलंबुन रहावे लागते.काही कामं करण्यावर बंधन येतात.

मध्यंतरी मंगेशला आर एच पी फाउंडेशन रत्नागीरी यांचे अध्यक्ष सादिक करीम नाकाडे यांची माहिती मिळाली .मंगेशची परिस्थिती जाणून घेऊन आर एच पी फाऊंडेशन आणि फ्रेण्ड्स फाउंडेशन ऐरवली मुंबई यांच्या सहकार्याने मंगेश शिवगण याचे नाव निओमोशन गाडीसाठी इम्पॅक्ट गुरू फाऊंडेशनशी ओळख झाली.त्यांच्या मदतीने निओमोशन ही इलेक्ट्रिक व्हील चेअर मिळाली.निओ मोशन गाडीमुळे त्याच्या आयुष्यात अमुलाग्र बदल होणार आहे.तो पुर्णत: सेल्फ डिपेंडन्ट बनणार आहे.कोणाच्याही मदतीशिवाय बाहेर जावुन काम करु शकणार आहे.मंगेश व त्याच्या कुटुंबीयांनी आर एच पी फाऊंडेशन आणि इतर सर्वांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button