
सैतवडे येथे नेपाळी महिलेची आत्महत्या.
रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथे एका नेपाळी महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. उर्मिला मायाराम लोनिया (४०, रा. सैतवडे, रत्नागिरी, मुळ रा. केलाली नेपाळ) असे या मृत महिलेचे नाव आहे. उर्मिला हिने १५ मार्च रोजी राहत्या घरी आंबा फवारणीचे विषारी द्रव्य प्राशन केले. उपचारासाठी तिला प्रथम खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र व नंतर जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान उर्मिला यांचा मृत्यू झाला अशी नोंद जयगड पोलिसांत करण्यात आली आहे.www.konkantoday.com