
संचयनीच्या बंद इमारतीसह आठ मालमत्ता सील, चिपळूण नगर परिषदेची कारवाई.
वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मंगळवारपासून नगर परिषदेने मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली आहे. पहिल्या दिवशी संचयनीच्या बंद इमारतीसह ८ मालमत्ता सील केल्या आहेत. त्यामुळे कारवाईला जाताच अनेकजण पैसे भरत असल्याने एका दिवसात १० लाख रुपयांची वसुली झाली आहे. तर आतापर्यंत तोडलेल्या ५३ नळकनेक्शन धारकांपैकी २३ जणांनी पैसे भरून आपला पाणीपुरवठा पूर्ववत करून घेतला आहे.
चिपळूण नगर परिषदेला यावर्षी मालमत्ता व पाणीपट्टी करातून थकित व चालू वर्षाची मिळून १८ कोटी ३३ लाख ८१ हजार ५३७ रुपयांची वसुली अपेक्षित आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे १० कोटी ३० रुपये वसूल झाले असून ५८ टक्के वसुली झाली आहे.www.konkantoday.com