मुंबई-गोवा महामार्गावरील खेड-दाभिळनजीक अपघातात ५ जण जखमी.

मुंबई-गोवा महामार्गावरील दाभिळनजीक मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास रस्त्यालगत उभ्या असलेल्या आय-२० कारला पाठीमागून येणार्‍या दुसर्‍या कारने धडक दिली. अपघातात ७ वर्षीय चिमुरडीसह चौघेजण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी घरडा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सायंकाळी उशिरापर्यंत कारचालक राजेंद्र भिकू मिरगल (६०, रा. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.अभिषेक घाडगे (३२), तेजश्री अभिषेक घाडगे (१५), श्री भोईर (७) अशी जखमींची नावे आहेत. चालक अभिषेक घाडगे हे आय-२० कारने (एम.एच. १४ डी.एन. ४३७९) चिपळूण येथून मुंबईला जात होते. दाभिळनजीक आले असता विश्रांतीसाठी कार रस्त्यालगत उभी केली होती. या दरम्यान, चालक राजेंद्र मिरगळ हा किया कारने (एम. एच. ४६ बी. व्ही. ६२६५) मार्लेश्वर येथून पनवेलच्या दिशेने जात होता.

रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारचा अंदाज न आल्याने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर उभी कार उलटून आतील पाचजण जखमी झाले. रणरणत्या उन्हात घडलेल्या अपघाताने सुरूवातीला काही काळ वाहतूक ठप्प झाली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button