
मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथील दुचाकी अपघातात जखमी महिलेचा मृत्यू.
मंडणगड तालुक्यातील धुत्रोली येथे ७ मार्च रोजी दुचाकी घासून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनुराधा आशिष मोरे (३४, म्हाप्रळ चिंचाळी) या महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले. याबाबत मृत महिलेच्या पतीने मंडणगड पोलीस ठाण्यात १७ मार्च रोजी दाखल केलेल्या फिर्यादीतील माहितीनुसार अनुराधा मोरे व मुलगा हे दोघे ७ मार्च रोजी मंडणगड येथे बाजारासाठी आले होते. बाजार आटपून घरी परत जात असताना धुत्रोलीत राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी घसरून अपघात झाला.
यात अनुराधा मोरे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना मंडणगड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी माणगांव येथे पाठवण्यात आले. माणगांव येथून अधिक उपचारासाठी एम. बी. एम. रूग्णालय कामोठे येथे पाठवण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वी तपासणी केली असता त्या मृत झाल्याचे घोषित केले.www.konkantoday.com