
जगबुडी पात्र झुडुपांच्या विळख्यात, पाणीप्रश्न गंभीर.
भरणे येथील जगबुडी नदीपात्रात झुडुपाच्या विळख्यात अडकले आहे. नदीपात्रात सगळीकडे झुडपे वाढलेली असतानाही तोडण्यासाठी ग्रामपंचायतीला सवड मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वर्षानुवर्षे परिस्थिती कायम असून या बकाल नदीपात्रामुळे पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने पाणी प्रश्न अधिक गंभीर बनणार आहे. त्यामुळे नदीपात्र मोकळे करण्यास ग्रामपंचायत पुढाकार घेणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बारमाही वाहणार्या भरणे येथील जगबुडी नदीपात्रात जगबुडी पुलापासून तालुका कृषी खात्याच्या जागेपर्यंतचा परिसर झुडुपांनी झाकला आहे. नदीपात्रातील पाणीसाठ्यात रणरणत्या उन्हामुळे घट होत असताना झुडुपांमुळे पाणी अधिक प्रमाणात कमी होत आहे.www.konkantoday.com