
देवरूखातील शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
शिवसेना संगमेश्वर तालुका व दुर्गवीर प्रतिष्ठान रत्नागिरी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला नागरिक व शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देवरूख नगरीत जणू शिवशाही अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना आला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा आढावा घेण्यासाठी शिवकालीन शस्त्र, नाणी, मोडी लिपिपत्र, गडकिल्ले छायाचित्र प्रदर्शन शहरातील श्री लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालयात मांडण्यात आले.
प्रदर्शनाचे उदघाटन शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार सुभाष बने, जि.प. माजी अध्यक्ष रोहन बने, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद पवार, सोळजाई देवस्थानचे अध्यक्ष बापू गांधी, शस्त्र संकलक व मोडी लिपी अभ्यासक सुनिल कदम, माजी सभापती संतोष लाड, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, बबन बांडागळे, अनंत भुवड, राम कुंभार, प्रसाद सावंत, सुधीर चाळके, बाळा माने, सचिन मांगले, प्रल्हाद गायकवाड, दुर्गवीर प्रतिष्ठानचे जिल्हा प्रमुख रोहित बालडे, तालुका प्रमुख तेजस रेवणे, तालुका समन्वयक निशांत जाखी, प्रशांत डिंगणकर, योगेश सावंत यांसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दुर्गवीर उपस्थित होते.www.konkantoday.com