
सावध रहा आणि विखारी प्रचार खोडून काढा, आमदार शेखर निकम यांचे आवाहन
विखारी प्रचार करून मते मिळविण्याचा डाव आखण्यात आला आहे. गैरसमज पसरविण्यात येत आहे, यासाठी सावध रहा आणि विखारी प्रचार खोडून काढा, असे आवाहन आ. शेखर निकम यांनी करून ना. राणेंच्या विजयात कोकरे गटाचे मताधिक्य प्रचंड असणार हे आजच्या मेळाव्याच्या गर्दीने दाखवून दिल्याचे स्पष्ट केले. ही ताकद अशीच ठेवा आणि मतपेटीतून ताकद आता दाखवून द्या, असे आवाहन केले.कोकरे जिल्हा परिषद गटाचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील गावाचा मेळावा कुटरे येथे घेण्यात आला होता. यावेळी आ. शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार मधु चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष अतुल काळसेकर, शिवसेना तालुकाप्रमुख संदेश आयरे, प्रसिद्ध उद्योजक पिंट्याशेठ पाकळे, भाजप तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, नियोजन सदस्य शशिकांत चाळके, माजी सभापती शरद शिगवण, राजेंद्र मोकल, प्रकाश कानसे, युवा सेना तालुकाधिकारी निहार कांबळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आ. निकम बोलत होते.www.konkantoday.com




