
ताडोबातील जगप्रसिद्ध माया वाघिणीचा नैसर्गिक मृत्यू? वाघाचा सांगाडा सापडल्याने शक्यता बळावली
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कंपार्टमेन्ट क्रमांक 82 मध्ये वाघाच्या मृतदेहाचे अवशेष आढळले आहेत, त्यामुळे जगप्रसिद्ध माया वाघिणीच्या नैसर्गिक मृत्यूची शक्यता बळावली आहे.जवळपास 100 मीटर परिसरात हे अवशेष विखुरलेले असून या वाघिणीचा मृत्यू अंदाजे दोन महिने आधी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून ताडोबा प्रशासनाने माया वाघिणीच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू केली होती. याच मोहिमेअंतर्गत शनिवारी एक सांगाडा सापडला आहे. पण त्यावरून वाघाची ओळख पटवणे शक्य नसल्याने DNA वरून मायाची ओळख पटवण्यासाठी शरीराचे नमुने बंगलोर येथील येथे रवाना करण्यात आले आहेत.
माया वाघिणीचे वय सध्या 13 वर्ष आहे. संबंधित ठिकाणी फक्त सांगाडा सापडला आहे, त्या ठिकाणी कोणताच मानवी हस्तक्षेप नसल्याने मायाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
www.konkantoday.com




