
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कालावधीत ५ महिन्यांची वाढ; इच्छुक प्रशिक्षणार्थींनी संबंधित आस्थापनेशी संपर्क करावा
रत्नागिरी, दि. 19 : “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” या योजनेचा प्रशिक्षण कालावधी 6 महिने होता. 10 मार्च च्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षण कालावधी 11 महिने करण्यात आला आहे. तरी ज्या प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कालावधी संपलेला आहे आणि पुन्हा 5 महिन्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक आहेत, अशा प्रशिक्षणार्थींनी तात्काळ आपल्या संबंधित आस्थापनेशी संपर्क करुन रुजू व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरिता “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा प्रशिक्षण कालावधी 6 महिन्याचा होता. 10 मार्च रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशिक्षण कालावधी 11 महिने करण्यात आलेला आहे.
तरी ज्या प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कालावधी संपलेला आहे व पुन्हा 5 महिन्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छूक आहेत, अशा प्रशिक्षणार्थीनी तात्काळ आपल्या संबंधित आस्थापनेशी संपर्क करुन रुजू व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच अधिक माहितीसाठी “मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना” जिल्हा समन्वयक पांडुरंग कानडे, मो.नं. ८४२१२४१३३१ व नितीश मुरकर मो.नं. ७९७२९१४८४६ यांच्याशी संपर्क साधावा.000