
जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक सोमवारी
रत्नागिरी, दि. 19 : माजी सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 24 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संरक्षण संदर्भात तक्रारी असल्यास बैठकीस विहीत वेळेत उपस्थित रहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.000