
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात कार्यालय फोडून चोऱ्या करणारा सराई चोरट्या पोलिसांच्या ताब्यात.
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील दोन अपार्टमेंटमध्ये ओमकार डेव्हलपर्स व स्टार इन्शुरन्स कंपनी यांची कार्यालये फोडून सिसीटिव्ही डिव्हीआर व रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या संशयितास येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. पोलिसांनी संशयिताकडून मुद्देमाल जप्त केला आहे.रत्नागिरीसह मुंबई, पनवेल, गोवा, गुजरात येथील २० गुन्हे या सराईत चोरट्यावर दाखल आहेत.स्वप्नील राजाराम मयेकर (वय ३८, रा. सेक्टर १९, खारघर, जिल्हा रायगड, सध्या रा. छाया गेस्ट हाऊस, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २२) सायंकाळी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित स्वप्नील याने १४ सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास मारुती मंदिर परिसरातील दोन अपार्टमेंटमधील ओमकार डेव्हलपर्स व स्टार इन्शुरन्स कंपनी या दोन कार्यालये फोडून रोख रक्कम व सीसीटिव्ही डिव्हीआर चोरुन नेला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या घरफोडीच्या घटनांबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी गुन्हे उघडकीसाठी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात पोलिसांनी घटनास्थळांचे सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे मुंबईतील रेकॉर्डवरील संशयित स्वप्निल मयेकर यास ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच एलटी मार्गे पो. ठाणे मुंबई व पनवेल शहरामध्ये गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.संशयित स्वप्नील हा मुबंई व ठाणे येथील रेकॉर्डवरील सऱाईत गुन्हेगार असून त्यावर मुंबई, ठाणे, नवी मुंबई इत्यादी ठिकाणी चोरी घरफोडी असे सुमारे २० गुन्हे दाखल आहेत. तसेच गुजरात व गोवा या राज्यामध्ये त्याने गुन्हे केलेल आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक तानाजी पवार, पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, दिपराज पाटील, शांताराम झोरे, विवेक रसाळ, रमिज शेख, पोलिस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी कामगिरी केली.