
संगमेश्वर-देवरूख मार्गावर केबलसाठी खोदाईमुळे मार्गाची दुरावस्था.
संगमेश्वर-कोल्हापूर राज्यमार्गावर संगमेश्वर ते देवरूख मार्गावर केबल टाकताना मार्गाची दुर्दशा झाली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने देवरूखपासून संगमेश्वरपर्यंत ऐन उन्हाळ्यात झाडे लावण्यासाठी जागोजागी खड्डे काढले.
प्रत्यक्षात झाडे लावताना मात्र तो बुरंबीपर्यंतच लावली गेली. बुरंबीपासून संगमेश्वरपर्यंत मारलेले दोन फूट खोलीचे खड्डे आजही तसेच आहेत. खड्ड्यात जर झाडे लावायची नसतील तर ते खड्डे तातडीने बुजवून टाकावेत, अशी मागणी पादचार्यांनी केली आहे.www.konkantoday.com