
रत्नागिरी तालुक्यातील अनेक शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत केला भाजप मध्ये प्रवेश.
या बाबत सविस्तर वृत्त असे की रत्नागिरी तालुक्यातील शिवसेना उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत..आज भारतीय जनता पार्टी चे विचार पटल्याने कार्यकारी प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात मुंबई येथे शिवसेना उपतालुका प्रमुख – राकेश साळवी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक – संदीप सुर्वे नाचणे, रत्नागिरी शहर वॉर्ड क्रमांक – 5 चे शाखा प्रमुख दीपक गावडे, वॉर्ड क्रमांक 6 चे शाखा प्रमुख – दत्ता घडशी, उपविभाग प्रमुख नाचणे – दिनेश रिमुलकर, सेक्रेटरी दीपक सुपल,श्रीकांत घनवटकर, व राकेश साळवी आदी शिवसैनिकांनी आज भाजप मध्ये प्रवेश केला..


यावेळी भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत, तालुका अध्यक्ष दक्षिण दादा दळी, तालुका अध्यक्ष उत्तर विवेक सुर्वे, तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, शहर अध्यक्ष राजन फाळके, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष उत्तर प्रतिक देसाई,चव्हाण साहेबांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन आदी भाजप पदाधिकारी यावेळी उपस्थितीत होते.


