
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सकाळ सत्रात.
उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाची दाहकता दिवसभर जाणवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होवू नये, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा १७ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत. सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यातच उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्याच्या काही भागात पाण्याचा प्रश्नही भेडसावू लागला आहे. विद्यार्थ्यांना उन्हामध्ये ये-जा करावे लागते.
जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळा या पत्राच्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात वाढते तापमान व उन्हाच्या झळा यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच प्राथमिक शिक्षण विभागाच्या वार्षिक वेळापत्रकात १५ मार्चनंतर सकाळच्या सत्रात सकाळी ७.२० ते ११.३० या वेळेत शाळा भरवण्यात यावी, अशा सूचना शासनाच्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू होणार आहेत.www.konkantoday.com