
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघाचा जागीच मृत्यू.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या जोराची धडकेत दोघेजण जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघात तुरळ येथील गणेश मंदिराच्या नजीक घडला. तुरळ येथील सुरज फडकले (३५) आणि धामापूर येथील संदेश भोजने (४०) हे दोघे ठार झाले आहेतघटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एक्टिवा व युनिकॉर्न या दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने दुचाकीस्वार दोघेही फेकले गेले. यातील एक्टिवा दुचाकीचा नंबर एमएच ०८ बीए ७१६२ तर युनिकॉर्न गाडीचा नंबर एमएच ०८ एएम ६९६४ असा आहे.
या दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाल्याने एक दुचाकीस्वार जागीच मृत झाला तर दुसऱ्याला रुग्णालयात नेत असताना त्याचाही मृत्यू झाला. सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे संगमेश्वर पट्ट्यामध्ये काम सुरू आहे. अपघात झालेल्या ठिकाणी खरंतर दोन्ही मार्गिका काही काळ सुरू होत्या. काही वेळा काम सुरू असताना एक मार्गिका बंद ठेवून डायव्हर्शन करण्यात येते. यात कधी वाहन चालकांचा देखील गोंधळ उडतो. अशीच परिस्थिती या अपघातात झाली असावी अशी एकच चर्चा अपघाता दरम्यान ऐकायला मिळत होती.