
माथेरानमध्ये बेमुदत बंद जाहीर.
माथेरानमध्ये बेमुदत बंद जाहीर करण्यात आला आहे. येथील पर्यटन बचाव संघर्ष समितीने याबाबत निर्णय घेतला आहे.माथेरानमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या फसवणुकीच्या तसेच लुटीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे माथेरानची बदनामी होत आहे. या बदनामीचा माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे.
ही फसवणुकीची पद्धत करण्यात यावी, त्यासाठी माथेरान बंदची हाक देण्यात आली आहे. सोमवारी माथेरान बंदची हाक देण्यात आला होती, त्याला स्थानिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केलेल्या मागण्यांची पूर्तता स्थानिक प्रशासन करू शकत नाही, त्यामुळे समितीने आजपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे.
या बंदला हॉटेल इंडस्ट्री, ई रिक्षा संघटना, व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संस्था यांनी समर्थन दिले आहे. जोपर्यंत स्थानिक प्रशासन लेखी स्वरूपात मागण्या कायमस्वरूपी पूर्ण करत नाही, तोपर्यंत हे पर्यटनस्थळ बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेय. दरम्यान, या बंदमध्ये शालेय विद्यार्थ्यांना ई रिक्षाची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु कोणाही प्रवाशांना ही सेवा उपलब्ध नसेल.