महसूल विभागाची १३७.९५ कोटींच्या उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी पळापळ, फक्त ३७ टक्केच वसुली.

जिल्हा महसूल विभागाला मिळालेले १३७ कोटी ९५ लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची चिंता सतावत आहे. मार्च अखेर आल्याने हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घाई आता प्रशासनाला लागली आहे. यंदा फेब्रुवारीपर्यंत एकूण उद्दिष्टांपैकी सुमारे ३७ टक्केच वसुली झाली असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्याच्या महसूल विभागाला यावेळी महसूल उद्दिष्ट पूर्ण करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

जमीन महसूल, गौण खनिज, करमणूक कर, वसुली प्रमाणपत्र, नगर पालिका प्रशासन, रोजगार हमी योजना, शिक्षण कर, एनए, दस्त आदींच्या माध्यमातून महसूल विभागाला महसूल मिळतो. शासनाकडून आलेले हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी जोरात कामाला लागले आहेत. त्या विभागाकडून कर येथे बाकी आहे. त्यामुळे त्या विभागाच्या बैठका घेवून त्यांना कर भरण्याच्या सूचना दिल्या आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button