
जामदा प्रकल्पात अधिकार्यांची मनमानी खपवून घेणार नाही, आ. किरण सामंत यांचा इशारा.
जामदा प्रकल्पातील शेतकर्यंना विश्वासात घेवूनच प्रकल्पाचे काम केले जाईल. शेतकर्यांना योग्य मोबदला व योग्य पुनर्वसन करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करू. प्रशासनाच्यावतीने शेतकर्यावर कोणताही अन्याय होवू देणार नाही.
अधिकार्यांची मनमानी देखील खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आमदार किरण सामंत यांनी दिला.जामदा प्रकल्पातील अधिकार्यांचा मनमानी कारभार व अनेक वर्षे रखडलेले पुनर्वसनाचे काम या संदर्भात काजिर्डा मुंबईवासीय ग्रामस्थांनी आ. सामंत यांची आमदार निवास मुंबई येथे भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी रखडलेले पुनर्वसन, प्रकल्पातील अडचणी व अधिकार्यांची मनमानी याबाबत सामंत यांना लेखी निवेदन दिले. पुनर्वसन प्लॉट, निश्चित करताना शेतकर्यांना विश्वासात घेण्यात यावे. धरणाचे काम ६० टक्के पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. तर पुनर्वसनाचा निधी कोणत्या कामावर खर्च केला, याची देखील चौकशी करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.www.konkantoday.com