
घरकामासाठी ठेवलेल्या मोलकरणीने मालकाच्या घरातील दागिने घेवून पोबारा केला.
घरकामासाठी ठेवलेल्या मोलकरणीने मालकाच्या घरातील दागिने व पैसे घेवून पोबारा केल्याची घटना राजापूर तालुक्यातील सोलगाव येथे घडली आहे.याप्रकरणी चंद्रकांत सखाराम शेलार यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून वैष्णवी नलावडे (लोटे ता. खेड) हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत दागिने व रोख रक्कम असा सुमारे १४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. शेलार हे पत्नीसह तोलगाव, मुटवाडी येथे वास्तव्याला आहे सेवानिवृत्त असलेल्या शेलार यांच्या पत्नीला मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांनी घरकामासाठी मोलकरीण ठेवली होती. ती मोलकरीण या वृध्द पती-पत्नीसह घरातच राहत होती.शनिवारी दुपारी जेवल्यानंतर शेलार व त्यांची पत्नी झोपलेली असतांना दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घरकाम करणारी वैष्णवी नलावडे ही शौचालयाला जाऊन येते असे सांगून मागच्या दरवाजाने निघून गेली.जवळपास एक तास झाला तरी मोलकरीण परत न यांच्या पत्नीने श्रीचालयात पाहिले असता ती आढळली नाही.
. तसेच घरात ठेवले तिचे साहित्य देखील नव्हते पती-पत्नीने दुसर्या दिवशी सकाळपर्यंत मोलकरणीची वाट पाहिली मात्र मोलकरीण परत न आल्याने शेलार यांनी दागिने व पैसे ठेवलेले कपाट उघडून पाहिले असता कपाटातील दागिने व पैसे चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आहे. त्यामुळे वैष्णवी नलावडे हिने दागिने व पैसे चोरून नेल्याची फिर्याद शेलार यांनी राजापूर पोलीस ठाण्यात दाखल केली. यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, रिंग, कुडी व रोख रक्कम असा सुमारे १४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे शेलार यांनी या फिर्यादीत नमूद केले आहे.www.konkantoday.com