कंत्राटी शिक्षकांचे आझाद मैदानावर धरणे

रत्नागिरी : कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णयाचा पुनर्विचार करून हा शासन निर्णय पुनर्जीवीत करावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील ४०० कंत्राटी शिक्षकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांमध्ये कंत्राटी तत्त्वावरती ६७२ शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी केली होती. या जिल्ह्यामध्ये शाळा उघडण्यासाठी शिक्षक उपलब्ध नव्हते अनेक शिक्षकांच्या जिल्हा बदल्या झाल्या होत्या त्यामुळे येथील शैक्षणिक व्यवस्था बिघडली होती ही शैक्षणिक परिस्थिती टिकवण्याचे काम स्थानिक डी.एड., बीएड. धारक आणि पदवीधर शिक्षक यांनी केले होते. ते शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले.सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात २३ सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ४९५ शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या.

शासनाने १० फेब्रुवारी २०२५ रोजी घेतलेल्या शासन निर्णयाप्रमाणे या सर्व शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत. हे सर्व शिक्षक बेरोजगार होणार आहेत. ज्या शिक्षकांनी रत्नागिरी जिल्ह्याची शैक्षणिक व्यवस्था वाचवली अशा शिक्षकांवर उपासमारीची वेळ येत असल्याकारणाने रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षक आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुदर्शन मोहिते, अजिंक्य पावसकर, संजय कुळये, गिरीष जाधव, रुपेश झोरे, मृदुला देसाई, विनोद कांबळे, अमोल सावर्डेकर, रुपाली वाघे, सुशांत मुंडेकर, योगेश कांबळे, श्रेया कापसे, आरती तांबे, प्रिया गमरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button