
सातबारा उताऱ्यात झालेे 11 महत्त्वाचे बदल तुम्हाला माहीत आहे का?
मुंबई : मागील 50 वर्षांत पहिल्यांदाच महसूल विभागाने मोठे बदल करून सातबारा उताऱ्याला अधिक स्पष्ट, अचूक आणि समजण्यास सोपे बनवले असून नवीन सुधारणा केल्यामुळे आता कोणत्याही सामान्य नागरिकाला सातबारा उतारा वाचणे सोपे जाणार आहे!
**सातबारा उताऱ्यात पूर्वी आणि आता काय बदल झाले**
गावाचा कोड क्रमांक दिसणार
*आधी फक्त गावाचे नाव दिसत असे, पण आता त्यासोबत गावाचा कोड क्रमांक (LGD Code) असेल. यामुळे डिजिटल रेकॉर्ड अधिक व्यवस्थित ठेवता येतील.जमिनीच्या प्रकाराची स्पष्टतापूर्वी संपूर्ण क्षेत्र एकत्र नोंदवले जात असे, पण आता:लागवडीयोग्य क्षेत्र वेगळेपोटखराब क्षेत्र वेगळेत्यांची एकूण बेरीज स्वतंत्रपणे दर्शवली जाईलनवीन मापन पद्धती – संपूर्ण बदलपूर्वी सर्वच जमिनीसाठी एकाच प्रकारचे मापन एकक वापरले जात होते, पण आता:
शेतीसाठी ➝ हेक्टर, आर, चौरस मीटर बिनशेतीसाठी ➝ आर, चौरस मीटरखाते क्रमांक आता सरळ दिसेलपूर्वी खाते क्रमांक ‘इतर हक्क’ मध्ये दिसत असे.
आता तो थेट खातेदाराच्या नावासमोर दिसेल, त्यामुळे कोणत्या खातेदाराकडे किती जमीन आहे, हे लगेच समजेल.
*मृत खातेदारांची माहिती स्पष्ट*
पूर्वी मृत व्यक्तींच्या नोंदी कंसात दिसत होत्या. आता त्यावर आडवी रेष मारली जाईल, त्यामुळे कोण जिवंत आहे आणि कोण मृत आहे हे सहज समजेल.प्रलंबित फेरफारांची स्वतंत्र नोंदपूर्वी फेरफार प्रक्रियेत असलेल्या जमिनींसाठी स्वतंत्र रकाना नव्हता, त्यामुळे नागरिकांना गोंधळ होत असे.
आता ‘प्रलंबित फेरफार’साठी स्वतंत्र रकाना असेल.जुन्या फेरफार क्रमांकांसाठी वेगळा रकानापूर्वी सर्व फेरफार क्रमांक एका ठिकाणी मिसळून लिहिले जात, पण आता जुने आणि नवीन फेरफार क्रमांक वेगळ्या रकान्यात दिसतील.
खातेदारांच्या नावांमध्ये ठळक रेषापूर्वी दोन वेगवेगळ्या खातेदारांची नावे एकमेकांमध्ये मिसळली जात, त्यामुळे चुकून वाचनाच्या गडबडी होऊ शकत होत्या.
आता नावांमध्ये ठळक रेष असेल, त्यामुळे प्रत्येक खातेदार सहज ओळखता येईल. गट क्रमांकासोबत शेवटचा व्यवहार दिसेल.पूर्वी गट क्रमांक आणि शेवटच्या फेरफाराची माहिती वेगळ्या ठिकाणी शोधावी लागत असे, पण आता ती इतर हक्क रकान्यात शेवटी दिसेल.
बिनशेती जमिनींसाठी नवीन नियमबिनशेती क्षेत्र ‘आर चौरस मीटर’मध्येच मोजले जाईल.’जुडी’ आणि ‘विशेष आकारणी’ हे रकाने हटवले गेले.
अकृषिक जमिनींसाठी विशेष सूचनाआता सातबारा उताऱ्याच्या शेवटी स्पष्ट सूचना असेलसदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने गाव नमुना-12 लागू नाही.
या बदलांमुळे नागरिकांना होणारे थेट फायदेसातबारा उतारा वाचणे सोपे आणि स्पष्ट झाले.डिजिटल प्रणालीमुळे महसूल विभागाच्या कामात पारदर्शकता आणि वेग वाढला.
जमिनीशी संबंधित वाद आणि गैरसमज कमी होतील.ऑनलाइन सातबारा उतारा काढणे आणि समजणे सोपे होणार.बदलांमुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होईल.
ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो आणि डिजिटल सातबारा उताराराज्य सरकारने 3 मार्च 2020 रोजी सातबारा आणि आठ-अ उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यास मान्यता दिली होती. यामुळे सातबारा उताऱ्याचे डिजिटायझेशन वेगाने झाले आहे आणि आता नागरिक घरबसल्या ऑनलाइन सातबारा उतारा पाहू शकतात.